• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

‘मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा’



‘मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा’

मुंबई I वृतसंस्था

काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. परंतु, घोषणेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेले. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मोठे विधान केले आहे. विरोधी पक्षनेते पद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, त्या पक्षाला न्याय देईल असे अजित पवार पवार म्हणाले.
मुंबईत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. म्हणून मी ती जबाबदारी घेतली. नेतेमंडळींनी देखील सांगितले की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्याचमुळे या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचे म्हणणे आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झाले. असे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ‘मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, संघटनेत कोणतेही पद द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.