• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बौद्ध समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात परळीत समाज एकवटला, बौद्धजन संघर्ष समिती गठीत

◼️बौद्ध समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात परळीत समाज एकवटला, बौद्धजन संघर्ष समिती गठीत

परळी /प्रतिनिधी

महाराष्ट्रात तसेच परळी तालुक्यात बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात परळीत समाज एकवटला असून याविरोधात आवाज उठविण्यासाठी बौद्धजन संघर्ष समिती गठीत करण्यात आली आहे.
‌याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसांत बौद्ध समाजातील तरुणांच्या हत्या झाल्या आहेत.तसेच अन्याय, अत्याचार, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.याविषयी तसेच समाजातील युवकांमध्ये वाढलेले व्यसनाधिनतेचे प्रमाण,समाजाने बाबासाहेबांनी दिलेल्या पंचशीलेचे पालन करावे, समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धजन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीच्या वतीने आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत.
समाजाच्या वतीने काही जणांवर मिटींग आयोजित करणे,निरोप देणे, मागील बैठकीतील आढावा देणे, अशा आशयाचे नियोजन करण्यासाठी कांही जणांवर जिम्मेदारी दिली त्यामध्ये राहुल घोबाळे, बालासाहेब जगतकर, अनंत इंगळे, रवि मुळे, भारत ताटे,यशपाल मुंडे,केशव गायकवाड, गौतम साळवे, ज्ञानोबा मस्के, ॲड.संजय जगतकर आदिंचा समावेश आहे. भिमवाडी, भीम नगर आणि सिद्धार्थनगर येथील तिन्ही बैठकीला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.