• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

ND NEWS | जळगाव

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात आज न्यायालयात कामकाज झाले. मात्र गैरहजर राहिल्याने कोर्टाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून पॉलिहाऊस अनुदान, मुक्ताईनगर साखर कारखाना आणि इतर कृषीविषयक बाबींमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप २०१६ मध्ये केले होते. पाटील यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून खडसे यांनी जिल्हा न्यायालयात ५ काेटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

गैरहजर राहण्यास परवानगी

या प्रकरणातील सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून गुलाबराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला मात्र, खर्च म्हणून ५०० रुपयांचा दंड ही न्यायालयाने केला. तसेच उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही कोर्टाने दिली. या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ जून रोजी होणार आहे. गुलाबराव पाटील यांचे वकिल शैलेंद्र पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून ॲड.प्रकाश पाटील यांनी बाजू मांडली.