• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे

सगळ्या अवलींचा टोळीप्रमुख उद्धव ठाकरे; याचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करावा

  • भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा वाचला पाढा
¨ पेंग्विनने मुंबईच्या लूटमारीचं प्रेझेंटेशन बघावं

मुंबई : षण्मुखानंद येथे झालेल्या उबाठा सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीला दोष देत अनेक चुकीचे आरोप केले. याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी आपली भूमिका मांडली. यात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा पाढाच वाचला. त्यांच्या गद्दारी आणि देशद्रोहीपणामुळे त्यांचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा केला जावा, अशी मोठी मागणी नितेश राणेंनी ट्विटद्वारे युनोकडे केली आहे.

मुख्यमंत्री बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे उद्धव ठाकरेंनी स्वतःचे वडील, स्वतःचं कुटुंब आणि मराठी माणूस व हिंदू धर्माशी बेईमानी केली. यांच्यासारखा गद्दार आणि देशद्रोही परत जन्माला येणं शक्य नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी २०१४-१९ या काळात उद्धव ठाकरेंना सख्ख्या भावासारखं सांभाळलं त्यांच्याशीही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यामुळे हा दिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करावा, अशी खळबळजनक मागणी नितेश राणेंनी केली.

खरं तर चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. मात्र उद्धव ठाकरे काल अवलीकवली, केसांच्या कुठल्या कुठल्या भागांचा उल्लेख करत होते. हे कोणते पक्षप्रमुख? उलट महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा आदित्य ठाकरे ‘कवली’ आहे, असं नितेश राणे म्हणाले.

पेंग्विनने मेळाव्यात मुंबईच्या विकासकामांचं प्रेझेंटेशन (Presentation) दाखवून आणखी खोटारडेपणा केला. खरं तर २५-३०वर्षे त्याच्या कुटुंबाने मुंबईला अक्षरशः दरोडेखोरांसारखं लुटलं. स्वतःच्या प्रत्येक खर्चासाठी मुंबईकरांचे पैसे वापरले. मी पेंग्विनला आवाहन करतो की, मी वरळीचं नेस्को ग्राऊंड बुक करतो, तिथे येऊन मुंबईच्या लूटमारीचं प्रेझेंटेशन अमित साटम करुन दाखवतील ते तू बघावं.