• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात नळाच्या पाइपलाइनचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी युवा सेनेचे परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

परळी (प्रतिनिधी)

 

बंगला,देशमुख गल्ली व रामदासी यांच्या घरापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून पाईपलाईनचे काम झालेले नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यात अशुद्ध व घाण पाणी येत असल्यामुळे ते नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे.यामुळे या परिसरात परळी नगरपरिषदेने ताबडतोड पाईपलाइन चे काम करावे या मागणीचे निवेदन युवसेनेच्या वतीने परळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना दि.14 जुन 2023 रोजी देण्यात आले.

युवा सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंगला,देशमुख गल्ली तसेच रामदासी यांच्या घरापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून पाईपलाईनच्या कामाबाबत कसल्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही नवीन सिमेंट रस्ता झाला तरी काम झालेले नाही व पिण्याच्या पाण्यात नाल्यासारखे घाण,काळे व अशुद्ध पाणी येत आहे तरी याबाबतीत नगरपरिषदेचे कसल्याही प्रकारचे लक्ष दिसत नाही त्यामुळे भागातील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे.आणि नगर परिषदेने लवकरात लवकर पाईपलाईनचे काम केले नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन अथवा उपोषण करण्यात येणार असल्याचे परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे युवा सेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे