• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

दिलीप खिस्ती, मनिषाताई तोकले, कल्याण कुलकर्णी पत्रभूषण, समाज भूषण, कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित

◼️दिलीप खिस्ती, मनिषाताई तोकले, कल्याण कुलकर्णी
पत्रभूषण, समाज भूषण, कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित

बीड : देवडी येथील माजी सरपंच, स्वातंत्र्य सैनिक *माणिकराव देशमुख* यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारया कृषीभूषण, पत्रभूषण आणि समाजभूषण पुरस्कारांचे रविवारी बीड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान देवडी या संस्थेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात येतात..यावेळी पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते..
माणिकराव देशमुख हे शेतकरी होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि उत्तम वाचकही होते.. स्वातंत्र्य लढयात त्यांचा सहभाग होता.. त्यामुळे कृषी, पत्रकारिता, समाज कार्य करणारया बीड जिल्ह्य़ातील मान्यवर व्यक्तीना पुरस्काराने गौरविणयाचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला.. त्यानुसार लोकप्रश्नच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, सामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणारे ज्येष्ठ पत्रकार *दिलीप खिस्ती* यांना पत्रभूषण, बीड जिल्हयातील महिला, ऊस तोडणी कामगार आणि सामांन्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला आवाज बुलंद करणारया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां *मनिषाताई तोकले* यांना समाज भूषण आणि धुनकवाड सारख्या माळरानावर आपल्या कठोर परिश्रमानं नंदनवन फुलविणारे प्रगतीशील शेतकरी *कल्याण कुलकर्णी* यांना कृषी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले..
यावेळी विश्वंभर चौधरी यांनी तिघांचेही अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या..
सत्काराला उत्तर देताना मनिषा तोकले यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले.. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी माणिकराव देशमुख यांनी आपल्या गावात केलेल्या विविध कार्याची माहिती उपस्थितांना देत राज्य स्तरावर काम करणारया एका पत्रकाराला देखील पुढील वर्षीपासून महाराष्ट्र पत्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल अशी घोषणा केली..
यावेळी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेचे प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, संघटक सुभाष चौरे, प्रकाश कांबळे, जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, कार्याध्यक्ष सतीश बियाणी, उपाध्यक्ष रवी उबाळे आदि उपस्थित होते…