• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

परळी प्रतिनिधी

परळी नगर परिषदेतील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळावा तसेच इतर मागण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस असून विविध पक्ष व संघटनेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी नगर परिषदेतील विविध कर्मचारी हे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्या संदर्भात परळी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर काल पासून साखळी उपोषणाला बसले आहेत. सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता, महागाई भत्ता, व डी.सी.पी.एस खाते क्रमांक मिळावा. निवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण व थकीत बीले मिळावीत आदी मागण्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच हजार रुपये दिलेली अग्रीम सातव्या वेतन आयोगाच्या कोणत्याच हप्त्यातून कपात करण्यात येऊ नये , 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी डी.सी.पी.एस. खाते क्रमांक देण्यात यावा महागाई भत्त्याची सर्व प्रकारची रक्कम देण्यात यावी निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत बीले तात्काळ देण्यात यावीत आदी मागण्या संदर्भात परळी नगरपरिषद कार्यालयासमोर पाच जून पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या साखळी उपोषणाला शहरातील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, संघटनांचे कार्यकर्ते आदिंनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.