• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रा.डॉ.राजश्री कल्याणकर यांना पीएच्.डी. प्रदान

ByND NEWS INIDIA

Apr 26, 2023

प्रा.डॉ.राजश्री कल्याणकर यांना पीएच्.डी. प्रदान

परळी , दि. २६/ ०४ / २०२३ (प्रतिनिधी)

येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा डॉ. राजश्री कल्याणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच्.डी ही शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी प्रदान केली आहे.

त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय ,अंबाजोगाई येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. गणपत आय. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली “मैथिलीशरण गुप्त के खंडकाव्यों में नारी चित्रण” या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबंध विद्यापीठास सादर केला होता.त्या प्रबंधाचे बहि:स्थ परीक्षकांनी अनुकूल अभिप्राय दिल्यानंतर नुकतीच डॉ. भारती गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने ‘मौखिकी’पार पडली आणि त्यानंतर त्यांना विद्यापीठाने पीएच् .डी.ही पदवी बहाल केली.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख , प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे डॉ. ईश्वर पवार , डॉ .रमेश सोनटक्के ,डॉ.राम बडे याबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.