• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उखळी येथे भीम जयंतीचे आयोजन चंद्रकांत हंडोरे याची विशेष उपस्थिती

उखळी येथे भीम जयंतीचे आयोजन
चंद्रकांत हंडोरे याची विशेष उपस्थिती

परळी / प्रतिनिधी

दिनांक २७ एप्रिल २०२३ मौजे ऊखळी खुर्द,सकाळी ठीक 9:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मा. सामाजिक न्यायमंत्री आयु.चंद्रकांत दादा हंडोरे सोबतच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग आयु.सिध्दार्थजी हत्तीअंबीरे, शक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनकर दादा ओकार,गंगाखेड शहरातील आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ सुप्रसिध्द ऱ्हदयरोगतज्ञ,तथा अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सुतगिरणीचे चेअरमन आयु.डॉ सिध्दार्थजी भालेराव प्रमुख वक्ते ,आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज एम.एम. सुरनर, गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य संघटक गौतम मुंडे, रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंत भालेराव, रिपाई परभणी जिल्हा जिल्हाकार्याध्यक्ष नवनाथ मुजमुले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष टी.डी रुमाले, शक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश नरवाडे, पीएसआय ज्ञानोबा फड, पीएसआय तुकाराम फड, भीमशक्तीचे औरंगाबाद शहराध्यक्ष सचिन भोले, योगेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते राजू भाई झाल्टे या सर्व मान्यवरांच्या ऊपस्थितीत विश्वरत्न ,विश्वभूषण , महामानव,आधुनिक भारताचे निर्माते ,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब तथा भिमराव रामजी आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती अनुषंगाने प्रबोधन सत्राचे व भव्य व्याख्यानाचे आनी भव्य प्रतिमा मिरवणुक आयोजन सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे.
तरी आपन सर्वानी उपस्थित राहुंण जयंती कार्यक्रम तथा महापुरुष डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर प्रतिमा मिरवनुक मध्ये सहभागी होउन, शांततेचे सहकार्य करावे,जयंती महोत्सव ची शोभा वाढवावी, ही विनंती, आणि आपन सर्व जन शांततेचे सहकार्य कराल, शांतता ठेवन्यासाठी पोलिस प्रशासनास आपनही मद्दत करावी. असे आयोजन करण्यात आले आहे तरी समतेचा विचार जनमानसात रूजविन्यासाठी आम्ही येतोय क्रांतीच्या मशाली घेवुन आपणही यावे असे आव्हान जयंती कमिटी ऊखळी खुर्द यांच्यावतीने करण्यात येत आहे.