• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️आद्य शंकराचार्यांनी तब्बल १२५० वर्षांपुर्वी दिली होती पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्रभेट ; स्मृतींना उजाळा !

◼️आद्य शंकराचार्यांनी तब्बल १२५० वर्षांपुर्वी दिली होती पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्रभेट ; स्मृतींना उजाळा !

◼️परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे आनावरण_

बीड (परळी वैद्यनाथ)

ND NEWS

सनातन वैदिक हिंदू धर्माची ग्लानी दूर करून धर्माची पुन:र्स्थापना करणारे आद्य शंकराचार्यांच्या जयंती दिनाचे (दि.25) औचित्य साधून परळीत आद्य शंकराचार्य चौक व आद्य शंकराचार्य प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे अनावरण आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ क्षेत्राला तब्बल बाराशे पन्नास वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी भेट दिल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या चौक व प्रदक्षिणामार्ग नामकरणामुळे आद्य शंकराचार्यांच्या पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र भेटीच्या स्मृतींना एक प्रकारे उजाळा मिळाला आहे.या परिसराचा परिपूर्ण विकास करण्याचे आश्वासन हा धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
वैद्यनाथ नगरीत आद्य शंकराचार्य प्रदक्षिणा मार्ग व चौकाच्या नामफलकाचे अनावरण आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.यावेळीवैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख,विश्वस्थ प्रा.बाबासर देशमुख,नागनाथकाका देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे,तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,राजेंद्र सोनी,जयराज देशमुख,रमेश चौंडे,सचिन जोशी,रामभाऊ गोस्वामी,श्रीरामपंत जोशी,जितेंद्र नव्हाडे, मनोज रामदासी, राजीव तिळकरी प्रदीप अग्निहोत्री, श्रीपाद पाठक, दिनेश लोंढे, ऋषीकेश नागापूरे,सुरेश राजूरकर, अजिंक्य भालेराव, प्रशांत नाईक,महेश देशपांडे, दीपक हिंदू , दयानिधी खिस्ते, प्रल्हाद बिडगर, बालाजी शहाणे , मिलिंद देशपांडे, महेश विर्धे , दीपक जोशी,दत्ता गोस्वामी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

● *आद्य शंकराचार्य १२५० वर्षांपूर्वी आले होते परळीत….!*

साधारण 1300 वर्षापूर्वी हिंदुधर्मावर अन्य धर्मांचे आक्रमण व अन्य कारणांमुळे धर्माला एक प्रकारे ग्लानी आली होती. आपले विचार, संस्कृती, राहणीमान, धार्मिकता बदलली गेली होती त्यावेळी हिंदु धर्माची पुनः स्थापना करण्याचे काम आद्य शंकराचार्य यांनी केले. अनेक मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.संपूर्ण भारत भ्रमण करत असताना त्यांनी 1250 वर्षापूर्वी परळीसही भेट दिली. या भेटीची नोंद ताम्रपत्रावर, भुजपत्रावर श्रंगेरी येथील मठात आहे. तसे एक पत्र वैद्यनाथ देवस्थानच्या दस्तावेजांतही उपलब्ध आहे. बारा ज्योतिर्लिंग यात्रा करताना पंचम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आद्य शंकराचार्य हे परळीत आले होते. सनातन वैदिक हिंदू धर्मातील आद्य शंकराचार्यांना भगवान महादेवाचा अंश मानले जाते. त्यामुळे परळी वैद्यनाथ हेच पंचम ज्योतिर्लिंग असल्याचा निर्वाळा आहे. आद्य शंकराचार्यांनी परळी येथे भेट दिली होती. त्याचप्रमाणे परळी वैजनाथ मंदिरात आद्य शंकराचार्य यांचे मंदिरही जुन्या काळापासून आहे. आद्य शंकराचार्य आणि परळी वैजनाथ हा अतिशय पुरातन संबंध असून आद्य शंकराचार्य रचित ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्येही ‘परल्याम् वैद्यनाथंच’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान परळी वैजनाथ येथे आद्य शंकराचार्यांच्या नावाने चौक व प्रदक्षिणामार्ग नामकरणामुळे आद्य शंकराचार्यांच्या पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र भेटीच्या स्मृतींना एक प्रकारे उजाळा मिळाला आहे.