• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 अंबलटेक गावाच्या विकासाची एक ना एक वीट माझ्या हातून; राजकीय प्रवासात सुरुवातीपासून हे गाव माझ्या पाठीशी – धनंजय मुंडे

 अंबलटेक गावाच्या विकासाची एक ना एक वीट माझ्या हातून; राजकीय प्रवासात सुरुवातीपासून हे गाव माझ्या पाठीशी – धनंजय मुंडे

जलजीवन मिशन अंतर्गत अंबलटेक पाणीपुरवठा योजनेचे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

बीड ( परळी वैद्यनाथ ) : नितीन ढाकणे

अंबलटेक गावाच्या विकासाची एक ना एक वीट माझ्या हातून रचली जात आहे, याचा मला आनंद वाटतो. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाल्यापासून हे गाव कायम माझ्या पाठीशी राहिले आहे. माझे जन्मगाव असलेल्या नाथऱ्याने मला जितके प्रेम दिले तितकेच प्रेम अंबलटेक गावाने दिले, असे भावोद्गार आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

परळी मतदारसंघातील अंबलटेक येथे रविवारी सायंकाळी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 30 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

या गावाचा चेहरा मोहरा विकासाच्या माध्यमातून बदलून दाखवू, आपण सत्तेत नसलो तरीही विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

यावेळी मा.आ.संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, शिवाजीराव सिरसाट, रा.कॉ.चे अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, विधानसभा प्रमुख गोविंदराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, विश्वंभर फड, अमर देशमुख, माऊली जाधव, बाळासाहेब माले, दत्ता यादव, सत्यजित सिरसाट, बालासाहेब डोंगरे, बंडू गित्ते, विठ्ठलराव मुंडे, गौतम चाटे, भास्कर गोडबोले, वैजनाथ मुंडे, केशव नागरगोजे, बाळासाहेब नागरगोजे, भागवतराव नागरगोजे, मदन नागरगोजे, व्यंकटी मुंडे, अरुण नागरगोजे, राहुल नागरगोजे, एकनाथ मुंडे, भास्कर मुंडे, गोविंद नागरगोजे यांसह आदी उपस्थित होते.