• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा ‘ मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ 2023 चा राज्यस्तरीय पुरस्कार जिजाराम राजाराम फड यांना प्रधान

◼️सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा ‘ मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ 2023 चा राज्यस्तरीय पुरस्कार जिजाराम राजाराम फड यांना प्रधान

◼️परळी वैद्यनाथच्या पावन भूमीमध्ये मानाचा आणखी एक तुरा जिजाराम राजाराम फड कार्यकर्तुत्वाने सन्मानित

परळी वैद्यनाथ | प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्यातील सरपंचासाठी कार्यरत असलेल्या, सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श तयार करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून केले जाते.त्याच बरोबर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने विविध उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून
‘ मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ यामाध्यमातून राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने ‘ मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा ‘ राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोहळा – 2023 वार-रवीवार दि.23 एप्रिल 2023 दुपारी 1.30 वाजता संपन्न झाला आहे, 2023 या वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी सत्कारमूर्ती श्री.जिजाराम राजाराम फड यांना समाजभूषण पदवीने सन्मानित करण्यात आले.

जिजाराम फड यांच्या माध्यमातून समाजासाठी अनेक उपयोगी उपक्रम हाती केले जातात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच विविध समाज हित जोपासणाऱ्या बाबी यामध्ये व्यायाम शिबिर असतील व्यायामाबद्दल मार्गदर्शन असेल , प्राणायाम व समाज हितासाठी मार्गदर्शन करणे हे त्यांचे दैनंदिन कार्य आहे.

दैनंदिन कार्यामध्ये आपण जोडल्यागेलेल्या अनेक सोशल ग्रुपमध्ये समाज हिताची समाज उपयोगी असणारी कार्य त्यांची माहिती सुविचार , पोस्ट ,पंचांग , व्यायाय असेल अशा अनेक नानाविध बाबी समाजासमोर मांडून समाजाला एक आदर्श प्रस्थापित करण्याचे काम आणि त्याच माध्यमातून समाजामध्ये काहीतरी चांगल्या बाबी निर्माण व्हाव्यात याच उदात्त हेतूने जिजाराम राजाराम फड हे कार्य करत असतात धर्मापुरी तालुका परळी वैजनाथ येथील छोट्याशा गावामधून पुढे आलेले हे नेतृत्व महाराष्ट्र पुरस्कारच मानकरी ठरेल असं कोणाला वाटलं की नव्हतं परंतु त्यांच्यामध्ये असणारी इच्छाशक्ती त्यांचे कर्तुत्व समाज उपयोगाची कार्य हे त्यांना या शिखरापर्यंत घेऊन आली या उच्च पुरस्काराचे मानकरी जिजाराम राजाराम फड हे गावांमध्ये अनेक नानाविधी कार्यकर्ता असतात त्यामध्ये गरीब मुलांना शिक्षणाच्या सुविधा असेल, जनगण शिक्षणाचे संधी उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग पर्यंत सर्व शिक्षणासाठी मदत करणारे जिजाराम फड हे आहेत. आणि अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणं हे आवश्यकच आहे याचे कारण असे की अशा व्यक्तिमत्त्वाचा सामान झाला तर इतर वेळी आपण अशा प्रकारे आदर्श घेण्याची संधी मिळेल व यांच्या आदर्श वर नवीन पिढी याच आदर्श चालून समाधीची आणि समाज उपयोगी कार्य करू शकतात हेच या पुरस्कारातून समोर आलेल फलित आहे.