• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी शहर भाजपला आणखी एक धक्का; शहर उपाध्यक्ष धनराज कुरील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल

परळी शहर भाजपला आणखी एक धक्का; शहर उपाध्यक्ष धनराज कुरील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल

आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

ND NEWS | परळी वैद्यनाथ (दि. 23) –

 

परळी वैद्यनाथ शहर भाजपला आणखी एक धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे परळी शहर उपाध्यक्ष धनराज कुरील हे आज आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.

कुरील परिवाराचे जनसंघाच्या उभारणीपासून भाजपच्या जडणघडणीत योगदान आहे. धनराज कुरील यांचे वडील स्व. पुनमचंद कुरील हे परळी शहराचे नगरसेवक राहिलेले व जनसंघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. धनराज कुरील यांनी भाजप नेतृत्वाला कंटाळून आ.धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने परळी शहर भाजप मधील प्रमुख प्रवाहातील नेत्यांना हा धक्का मानला जात आहे.

दरम्यान आज धनंजय मुंडे यांच्या पंढरी निवासस्थानी धनराज कुरील यांनी पक्षप्रवेश केला, आ.मुंडे यांनी धनराज यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, युवा नेते अमित केंद्रे आदी उपस्थित होते.