• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मंठा तालुक्यातील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्याना घरकुले द्यावीत अन्यथा आंदोलने करू : सारिका वरणकर ( जिल्हाध्यक्षा असंघटित कामगार महिलाकाँग्रेस कमिटी जालना )

ByND NEWS INIDIA

Apr 17, 2023

मंठा तालुक्यातील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्याना घरकुले द्यावीत अन्यथा आंदोलने करू : सारिका वरणकर ( जिल्हाध्यक्षा असंघटित कामगार महिलाकाँग्रेस कमिटी जालना )

जालना | प्रतिनिधी

असंघटित कामगार कर्मचारी कामगार महिला काँग्रेस कमिटी जालना सो सारिका ताई वरणकर यांनी आज मंठा पंचायत समिती येथे वंचित राहिलेल्या रमाई आवास योजना पासून लोकांना एकत्र करून गट विकास अधिकारी साहेबांना एक निवेदन प्रस्ताव दाखल करून गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून यातल्या एकाही महिलांना घरकुल मिळाला नाही तर त्यांना तात्काळ घरकुल टाकण्यात यावे आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आर्थिक बाबीची उलाढाल करून एकेकाला दोन दोन तीन चार चार असे भरपूर दिले आहेत यावर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर प्रशासन विस्तार अधिकारी साहेबांना असं म्हणल्या की तुम्ही सर्वे करून या सर्व वंचित राहिलेला रमाई आवास योजने पासून वंचित राहिला पाहणी करून त्यांचा हक्क त्यांना देण्यात यावा अशी मागणी केली आहे