• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही ?

ByND NEWS INIDIA

Apr 12, 2023

अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही ?

अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारभाजपबरोबर जाणार आहेत, असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतयांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

अंजली दमानिया यांना माहिती भाजपकडून मिळाली असेल तर त्या बोलल्या असतील. पण, अजित पवार काय असं करतील असं वाटत नाही. अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. तर, वेणूगोपाल राव यांनी उध्दव ठाकरेंकडे वेळ मागितली आहे वेळ त्यांना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.