• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी नगर परिषदेसमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन संपन्न

परळी नगर परिषदेसमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन संपन्न

परळी

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग चा दुसरा हप्ता; महागाई भत्ता फरकाची रक्कम; डी.सी.पि.एस खाते क्रमांक देण्यात यावा तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण व थकीत बिले देण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्याकरिता सर्व कर्मचाऱ्यास दहा हजार फेस्टिवल देण्यात यावा तसेच 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी डी सीपीएस खाते क्रमांक देण्यात यावा महागाई भत्त्याची सर्व फरकाची थकीत रक्कम देण्यात यावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत बिल तात्काळ देण्यात यावे .व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यात यावी सातव्या वेतन आयोगाच्या दुसरा हप्ता देऊन रमजान ईद व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करण्यात यावा.तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला निवृत्त झालेल्या पदावर परत करारनाम्यावर घेण्यात येऊ नये त्या जागी त्या पदाच्या शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या कर्मचाऱ्यास त्या पदावर संधी देण्यात यावी या व इतर मागणीसाठी
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नगरपालिका विंग परळी वै. यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले या वेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.