• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लाभार्थी राशन धारकांना आनंदाची शिधा लवकर मिळण्यासाठी पुरवठा अधिकरी यांना दिले निवेदन : माधवी चंदरकी

ByND NEWS INIDIA

Apr 12, 2023

लाभार्थी राशन धारकांना आनंदाची शिधा लवकर मिळण्यासाठी पुरवठा अधिकरी यांना दिले निवेदन : माधवी चंदरकी ( अध्यक्षा :औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार विभाग)

◼️छत्रपती संभाजी नगर : प्रतिनिधी

ND NEWS | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लाभार्थी राशन धारकांना आनंदाची शिधा लवराकत लवकर मिळावी या साठी प्रशासनाने जातीने लक्ष घालुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यास मदत करावी.

तसेच हा आनंदाची शिधा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा म्हणुन या आनंदाचा शिधा चा गरीब वस्ती मध्ये प्रचार व प्रसार करावा. अशा सुचना स्वस्त धान्य दुकानदार यांना द्यावयात. असे निवेदन माधवी चंदरकी ( अध्यक्षा :औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार विभाग) यांच्या वतीने प्रशासनला करण्यात आले.