• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर 7 कोटी 91 लाख 96 हजाराचे अनुदान वर्ग

◼️परळी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर 7 कोटी 91 लाख 96 हजाराचे अनुदान वर्ग

परळी : नितीन ढाकणे

परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार,श्रावण बाळ, वर्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत वर्ग करण्यात आले आहे. सरकारकडून निराधारांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्तीवेतन आदी वेगवेगळ्या योजना शासन दरबारी राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत राज्य शासन व केंद्र शासन दोघांचे मिळून लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येते. विविध योजनेतील 21 हजार 951 लाभार्थ्यांना 7 कोटी 91 लाख 96 हाजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची माहिती परळी तहसीलचे नायब तहसीलदार बी. एल. रुपनर यांनी दिली आहे.दरम्यान अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच एप्रिल 2023 रोजी वर्ग करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी संख्या 5929 लाभार्थीं आहेत. जानेवारी ते मार्च-2023 चे अनुदान रुपये 3000/- तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी संख्या 16022 लाभार्थी आहेत. माहे. डिसेंबर-2022 ते मार्च-2023 पर्यंतथे प्रत्येकी 4000/- अनुदान प्रत्येक बँकनिहाय दि. 5 एप्रील 2023 रोजी वर्ग करण्यात आलेले आहे. एकूण 21417 लाभार्थीना अनुदान पाठविण्यात आलेले आहे. तसेच केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थीना जानेवारी ते मार्च-2023 पर्यंत 2956 लाभार्थी पैकी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग लाभार्थीना प्रत्येकी 2100/-, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा लाभार्थीना 2100/- व तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतनत योजनेतील लाभार्थीना प्रत्येकी 3200/- पाठविण्यात आलेले आहेत. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग लाभार्थीना त्यांचे थकीत अनुदान माहे. एप्रिल ते ऑक्टोंबर 2022 पर्यंत 2100/- त्यांच खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. केंद्र पुरस्कृत योजनेचे थकीत अनुदान लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. एकूण 79196000/- रुपये अनुदान लाभार्थीच्या खात्यात बँकनिहाय वर्ग करण्यात आलेले आहे.

◼️परळी तालुक्यातील एकूण लाभार्थी संख्या
1 संजय गांधी निराधार अनुदान योजना =5929 2. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना = 16022
एकूण = 21951