• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

 

 

ND NEWS परळी ( प्रतिनिधी )

 

महामानव ,भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी परळीत एक वही एक पेन या अभिनव अभियानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक पत्रकार विकास वाघमारे यांनी दिली आहे .

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . आणि ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही . असे डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात . त्यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळावी या हेतूने एक वही एक पेन हा उपक्रम १४ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ९ ते १ या वेळेत राबविण्यात येणार आहे . अवांतर खर्च न करता या समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन या वेळेत आपण वही अथवा पेन आणून द्याव्यात . जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत .

या वेळी या अभियानाचे संस्थापक विकास रोडे ही उपस्थित राहणार आहेत . तरी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी ९ ०२८३४७३५८ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा .