• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रतिवर्षाप्रमाणे मौजे अस्वलांबा तालुका परळी वैद्यनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने सुरू

प्रतिवर्षाप्रमाणे मौजे अस्वलांबा तालुका परळी वैद्यनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने सुरू

ND NEWS | परळी वैद्यनाथ

मुझे अस्वलांबा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असतो त्याचप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गावातील लहान थोर सर्व महिला पुरुष युवक मोठ्या तळमळीने गावातील सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असतात याचे वैशिष्ट्ये म्हणजे गावामध्ये असणारा एकीचा सलोखा होय, अनेक वर्षांपासून मौजे अस्वलंबा तालुका परळी वैद्यनाथ या गावांमध्ये अतिशय आदर्श असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो सबंध पंचक्रोशी मधून,विविध भागांमधून भाविक भक्त येथील सप्ताह पाहण्यासाठी व कीर्तन श्राव्यासाठी येत असतात, या सप्ताहातील आजची चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. दिगंबर महाराज नकाते हादगाव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तुकाराम गाथा पारायण सोहळा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प शब्द साधक अविनाश महाराज भारती यांची किर्तन सेवा पार पडली तरी परिसरातील ग्रामस्थ मंडळींनी रोज किर्तन सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती अस्वलंबा समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून आलेले आहे तरी ज्ञान अमृताचा अवश्य लाभ घ्यावा अशी ही विनंती समस्त गावकरी बांधवांच्या वतीने केली जात आहे