• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हिवरा (गो.) येथील असंख्य ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

हिवरा (गो.) येथील असंख्य ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

बीड ( परळी वैद्यनाथ ):

परळी तालुक्यातील हिवरा (गो.) येथील असंख्य ग्रामस्थांनी आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यामध्ये प्रामुख्याने हिवरा (गो.) तालुका परळी येथील शामराव रामकिसन घोडके, भागवत माणिकराव देवकते, मुंजा साहेबराव देवकते, सुधाकर नामदेव घोडके, भागवत बालासाहेब घोडके, अप्पाराव गणपत भांड, उत्तम नारायण गंगणे, शंकर गंगणे, विनोद घोडके, दादाराव कुकडे, ज्ञानेश्वर निर्मळ, रवी राठोड, अमोल गिलभिले, राहुल साळवे, आकाश गावडे, अशोक सोळंके, माऊली देवकते, महादेव गावडे, विश्वंभर चिंचाणे आदींसह असंख्य ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, चंद्रकांत कराड, राजभाऊ पौळ यांसह रवींद्र  सरवदे, हनुमान घोडके, साहेबराव मिसाळ, राजेश इंदुरकर, किशोर निर्मळ, जीवन निर्मळ, आनंद निर्मळ, सुदामराव निर्मळ, गणेश चिंचाने, यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते. आ. धनंजय मुंडे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.