• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ओबीसी चे राजकीय आरक्षण संपविण्यासाठी महाराष्ट्रातील ईडी सरकारचे धोरण ! वसंत मुंडे

ओबीसी चे राजकीय आरक्षण संपविण्यासाठी महाराष्ट्रातील ईडी सरकारचे धोरण ! वसंत मुंडे

परळी वैजनाथ( प्रतिनिधी)

विधान मंडळामध्ये ईडी सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसीची जनगणना केली जाईल अशी जाहीर घोषणा केली. परंतु आजतागायत जनगणना संदर्भात कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. राज्यामध्ये ओबीसी जनगणना करण्यासाठी आर्थिक तरतूद केली नाही, राज्यस्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हास्तरीय तालुकास्तरीय जनगणना संदर्भात अधिकाऱ्यांच्या नेमणूक केल्या पाहिजेत. विधानमंडळात घोषणा केली म्हणजे ओबीसीचे आम्ही जनक आहोत असे ईडी सरकारमार्फत महाराष्ट्रातल्या जनतेवर पटवून देण्यात येत आहे .खरे तर आरएसएस बीजेपी व ईडी सरकारला महाराष्ट्रातून स्थानिक स्वराज्य मतदार संघातून ओबीसी आरक्षणावर निवडणुका घेऊ नयेत म्हणून प्रत्येक वेळेस न्यायालयामध्ये तारखा वाढून घेतल्या जात आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . भारतीय जनता पार्टीच्या वतीने अदानी, अंबानी,ललित मोदी निरव मोदी मोहुल चोक्सी विजय मल्ल्या जतीन मेहता इत्यादी भ्रष्टाचारी उद्योगपतीला शासकीय कामे व आर्थिक मदत करून त्यांचे कर्जही माफ करून टाकले या प्रश्नावर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी लोकसभेत देशातील बेरोजगारी महागाई सामाजिक विषमता नोटबंदी जीएसटी राफेल घोटाळा डिफेन्स कंपनीला दिलेले कामे
उद्योगपतीला दिलेल्या आर्थिक सहाय्य व बँकेचे केलेले कर्ज माफ या संदर्भात आवाज उठवला तर राहुल गांधीवर वेगवेगळ्या आरोप करून बदनाम करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले , व आदानी ग्रुप मध्ये 20 हजार करोड रुपये कुणी गुंतवले हा प्रश्न विचारल्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणे चव्हाट्यावर येत असल्यामुळे राहुल गांधी यांची कर्नाटक मध्ये 2019 च्या प्रचार सभेमध्ये मोदीवर टीका केली ते गृहीत धरून गुजरात मधील सुरत मध्ये त्यांच्यावर मानहानीचा खट्टाला दाखल करून न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा देऊन खासदारकी रद्द केली हा राजकीय डावपेच आखून आरएसएस बीजेपी ने ओबीसीच्या नेत्यांचा अवमान केला म्हणून देशभर आंदोलन उभे करून राहुल गांधीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले परंतु 1990 ला मंडल आयोगाला विरोध करणारे भारतीय जनता पार्टी आर एस एस व त्यावेळेस व्ही पी सिंग यांच्या सरकार ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात पाडण्यामध्ये सिंहाचा वाटा असून 1992 ला रथयात्रा काढून लालकृष्ण अडवाणी व नरेंद्र मोदी यांनी बाबरी मज्जिद राम जन्मभूमी मंदिराचा वादामध्ये देशभर जातीय दंगली घडवून देशांमध्ये अस्थिरता निर्माण केली. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी आरएसएस व ईडी सरकारने ओबीसी वर सगळ्या स्तरांमध्ये अन्याय केला असून राजकीय आरक्षणाचा व शिक्षणाचा , रोजगारीचा वस्तीग्रह बेरोजगारी ओबीसीच्या आर्थिक महामंडळाची तरतूद एमपीसी च्या परीक्षा निकाल व नोकर भरती संदर्भात प्रश्न असेल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिपचा प्रश्न असेल , सर्व प्रश्न प्रलंबित ठेवण्यासाठी ओबीसी विरोधात मोठे षडयंत्र ईडी सरकारच्या माध्यमातून जातीवादी शक्ती ओबीसीचे आरक्षण मुक्त करण्याचे धोरण राबवित आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.