• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धनंजय मुंडेंच्या आणखी एका मागणीला यश, परळी वैद्यनाथ मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी 12 कोटी रुपये निधी मंजूर

◼️धनंजय मुंडेंच्या आणखी एका मागणीला यश, परळी वैद्यनाथ मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी 12 कोटी रुपये निधी मंजूर

◼️मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आणखी 7 गावांना प्रमुख रस्त्यांशी जोडणारे रस्ते होणार चकाचक

◼️ND NEWS | परळी वैद्यनाथ

परळी वैद्यनाथ मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या आणखी एका महत्त्वपूर्ण मागणीला यश आले असून परळी तालुक्यातील सात गावांना प्रमुख महामार्गांशी जोडणाऱ्या 7 रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासासाठी सुमारे 12 कोटी रुपये निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे.

परळी तालुक्यातील राज्य रस्ता क्र. 221 ते वसंत नगर मोहदरा तांडा या सुमारे 4 किमी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 6 लाख, राज्य रस्ता क्र.228 ते दैठणा-गुट्टेवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 3 कोटी 37 लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग क्र. 361H ते धारावती तांडा-वैजवाडी रस्त्यासाठी 2 कोटी 59 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 B ते नाथ्रा रस्त्यासाठी 90 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 B ते भोपळा रस्त्यासाठी 1 कोटी 20 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 F ते ब्रम्हवाडी रस्त्यासाठी 48 लाख, राज्य रस्ता क्र. 55 ते हसनाबाद रस्त्यासाठी 1 कोटी 37 लाख अशा एकूण 7 गावांच्या रस्त्यांच्या कामांसाठी एकूण सुमारे 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

आ.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मतदारसंघातील अनेक प्रमुख व ग्रामीण मार्गांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते टप्प्याटप्प्याने चकाचक होत आहेत.