• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️संभाजी नगर पोलिसांनी एक तासांत आरोपीचा लावला छडा

◼️छेडछाडीच्या वादातून एकाचा काढला काटा ?

◼️संभाजी नगर पोलिसांनी एक तासांत आरोपीचा लावला छडा?

परळी |

 

:- भावकितील छेडछाडीच्या वादातून तरुणाचा काढला काटा?
प्राप्त माहिती अशी की परळी तालुक्यातील डाबी गावातील भावकितील एक तरुणाने काही दिवसांपूर्वी महिलेची छेड काढली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या सर्व घटनेची सविस्तर माहिती घेऊन काही तासांत संभाजी नगर पोलिसांनी आरोपींना गजाआड केल्याची मोठी कामगिरी बजावली आहे या कामगिरीने सभाजी नगर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

सविस्तर :- परळी शहरातील शाम मुखर्जी उड्डाण पुलावर एक भरधाव पिकअप गाडीने (एम.एच २१ एक्स-५७१३) एका मोटरसायकलला जोराची धडक देऊन फरार झाल्याची घटना दुपारच्या वेळी घडली असता तत्काळ घटना स्थळी संभाजी नगर पोलिसांनी धाव घेतली तो अपघात पाहून संभाजी नगर पोलिसांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आणि पुढील तपासला आपल्या खाकी वर्दीचा चाणक्यपणा दाखवत त्या पिकअपची चौकशी करून पुढील तपास सुरू केला असता परळी तालुक्यातील डाबी गावातील भावकितील मयत तरुणाने भावकितील भाऊजई होत असलेल्या महिलेचा हात धरून छेड काढल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी केल्याने त्या महिलेच्या दिराने मनात राग धरून घातपात परळीत घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे संभाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ठाकूर, पोह.बिकट,पोना शिंदे,मस्के,कोकाटे दुर्गे यांनी अवघ्या दोन तासांत आरोपी राम पारवे याला अंबाजोगाई शहरातून गजाआड केले असल्याने संभाजी नगर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…..

◼️सदरील मयत
संपत्ती भारत पारवे वय २३ वर्षे रा डाबी मयत व जखमी इसम नामे निकम केरबा एंगडे रा.डाबी आरोपी राम बाबु पारवे वय २५वर्ष रा डाबी यास अंबाजोगाईतुन ताब्यात घेवुन चौकशी सुरू असून पुढील तपास संभाजी नगर पोलीस करत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे ….

◼️चौकट
◼️सदरची कामगीरी मा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस निरीक्षक श्री सलीम चाऊस सपोनि ठाकूर पोह बिक्कड,पोना शिंदे मस्के, कोकाटे दुर्गे यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करीत आहेत.