• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️कन्हेरवाडी येथील भीम जयंतीच्या प्रती वर्षाप्रमाणे अध्यक्षपदी अंबादास दादा रोडे यांची निवड ◼️उपाध्यक्षपदी देविदास रोडे यांची निवड

◼️कन्हेरवाडी येथील भीम जयंतीच्या प्रती वर्षाप्रमाणे अध्यक्षपदी अंबादास दादा रोडे यांची निवड
◼️उपाध्यक्षपदी देविदास रोडे यांची निवड

परळी : शितलकुमार रोडे

दि.22 रोजी महामानव परमपूज्य , बोधिसत्व , भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मौजे कन्हेरवाडी येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे अध्यक्ष पद भूषवणारे श्री.अंबादास दादा रोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.
त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा भीम जयंती कमिटीचे अध्यक्ष श्री.अंबादास (दादा) रोडे तर उपाध्यक्षपदी देविदास रोडे, भीमराव रोडे उपस्थित होते.
येत्या 14 एप्रिल 2023 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कन्हेरवाडी येथील बौद्ध विहार येथून गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य अशी शोभायात्रेसह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक काढण्यात येणार असल्याचा ठराव सर्वांनी एकमतांनी संमत करण्यात आला आहे शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संग्राम रोडे यांनी मानले होते.
यावेळी कमिटीची कार्यकारणी पुढीलप्रमाणे ज्ञानोबा रोडे, सुधाकर रोडे,रोहिदास रोडे,भीमराव रोडे,राहुल रोडे , संग्राम रोडे, मुंजाजी रोडे, प्रकाश रोडे, सुभाष रोडे ,पिंटू रोडे, बेगराज रोडे, धनराज रोडे,शरद रोडे, पत्रकार शितलकुमार रोडे, नागेश रोडे, पवन रोडे,आदित्य(सोनू) रोडे,अजिंक्य रोडे,सचिन रोडे,शिवम रोडे,अमर रोडे,सागर रोडे,रुद्र रोडे,यांची सर्वांनुमते भीम महोत्सवाची जबाबदारी देऊन निवड करण्यात आलेली आहे..