• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; मालेगावात आज जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; मालेगावात आज जाहीर सभा

शिवसेनेत फुट, त्यानंतर गेलेले मुख्यमंत्रीपद, चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर सभा आज मालेगाव येथे होणार आहे. शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे कोणत्या मुद्यावर बोलणार, याची उत्सुकता राज्याला लागून आहे.
मालेगाव हा पालकमंत्री दादा भुसे यांचा बाल्लेकिल्ला आहे. तसेच नांदगाव आ. सुहास कांदे यांचा मतदार संघ आहे. उद्धव ठाकरे गटाने अव्दय हिरे यांना मालेगावमध्ये भुसेंच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरवण्यासाठी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिलेला आहे. त्यानंतर हिरेंना थेट उपनेतेपदी नियुक्त केलेले आहे.मालेगावात उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा घेण्याची चाचपणी करण्यासाठी
संजय राऊत यांनी दोनदा दौरे केले होते. मालेगावात पत्रकार परिषद घेत खा. राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या कथित भ्रष्टाचाराची वाच्यता केली होती.त्याचबरोबर खा.विनायक राऊत यांनीही मालेगावात गत आठवड्यात सभेच्या तयारीची आढावा बैठक घेऊन त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षातील गद्दार सभेत रडारवर असतील, असे संकेत दिले होते.
शिवगर्जना सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांंच्या बैठका झालेल्या आहेत. सभेच्या पूर्वसंध्येला खा. संजय राऊत यांच्यासह खा.विनायक राऊत तळ ठोकून होते