• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मराठी पत्रकार परिषद परळी च्या वतीने कु. सानवी चौंडे हीच्या उपचारासाठी आर्थिक मदत*

*मराठी पत्रकार परिषद परळी च्या वतीने कु. सानवी चौंडे हीच्या उपचारासाठी आर्थिक मदत*

परळी:- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा परळी वैजनाथ च्या वतीने *अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली *कु.सानवी संदिप चौंडे* हिच्या उपचारासाठी आज दि.23 मार्च 2023 रोजी 5 हजार रुपयाची मदत परळी तहसीलचे नायब तहसीलदार बी.एल.रुपनर, मंडळ अधिकारी मंगल मुंडे मॅडम यांच्याकडे देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, पवनराजे अर्बन निधी लि. चे चेअरमन प्रल्हाद सावंत, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष नितीन ढाकणे, डिजिटल मीडिया परिषदेचे परळी शहराध्यक्ष अभिमान्यु फड आदिंची उपस्थिती होती.