• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शानदार उद्घाटन: बालसंस्कार केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात झाले २८० प्रवेश*

  1. *शानदार उद्घाटन: बालसंस्कार केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात झाले २८० प्रवेश*

*सृजनशील व्यक्तिमत्वाचा पाया हा उत्तम संस्कारावर अवलंबून – सु.दे.लिंबेकर गुरुजी*

  1. परळी वैजनाथ, प्रतिनिधी….
    सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा पाया हा संस्कारावरच अवलंबून असतो. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकलेल्या या बालमनांना संस्कारशील बनवणे हे खरंतर आजच्या काळातील आव्हान आहे. स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टने हे आव्हान स्वीकारले असून अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा बाल संस्कार केंद्राचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आदर्श शिक्षक सु.दे. लिंबेकर गुरुजी यांनी केले. परळीत बालसंस्कार केंद्राचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
    स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट व नरवाडकर कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने ३ री ते ७ वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन आदर्श शिक्षक सु.दे.लिंबेकर गुरुजी यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुढी पाडवा शुभमुहूर्तावर अतिशय उत्साहात संपन्न झाले.उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक सु.दे. लिंबेकर गुरुजी,शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,काँग्रेस नेते डॉ. सुरेशजी चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे,धनंजय आढाव नारायणदेव गोपनपाळे, अमर मालक देशमुख, माजी नगरसेवक रमेश चौंडे,अनिल आष्टेकर, वैजनाथ बागवाले,जयराज देशमुख, गोविंद कुकर, शिक्षक नेते अजय जोशी, महावीरकाका संघई, डॉ.सौ.सुवर्णा टिंबे, सौ.ज्योतीताई नागापूरकर,सौ. वर्षाताई जोशी,युवा पत्रकार अनंत कुलकर्णी,युवक नेते सचिन स्वामी,अनंतराव भातांगळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी या उपक्रमाबद्दलची भुमिका मांडली.
    संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार!संस्कारच विद्यार्थ्यांना सर्वांगीण आकार देतात. सृजनशील व्यक्तिमत्वाचा पाया हा उत्तम संस्कारावर अवलंबून असतो.भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक कृतीचं संस्कारयुक्त असली पाहिजे. संस्कारा शिवाय जीवन म्हणजे भरकटलेले जहाज. आजकाल मोबाईल, टेलिव्हिजन,कार्टून गेम्स या चक्रात वाढत चाललेल्या या पिढीला संस्कारित करणे खूप गरजेचे झालेले आहे.पूर्वी विद्यार्थी जास्त खेळत असत तेंव्हा आईवडील विद्यार्थ्यांना जास्त का खेळतो म्हणून रागवायचे.आज विद्यार्थी खेळत नाहीत म्हणून पालक रागवत आहेत.अश्या या मोबाईल क्रांतीच्या वातावरणात मुलांचे पुढे काय होईल? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
    बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून मुलांना काही काळ का होईना पण गॅझेटच्या विश्वातून दूर घेवून जावून भारतीय संस्कृती व संस्कारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.
    यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आदर्श शिक्षक स.दे. लिंबेकर गुरुजी यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृती व संस्कार हे जगाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. संस्कारावरच व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी होत असते संस्कार हेच खऱ्या अर्थाने जीवन असते.सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा पाया हा संस्कारावरच अवलंबून असतो. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकलेल्या या बालमनांना संस्कारशील बनवणे हे खरंतर आजच्या काळातील आव्हान आहे. स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टने हे आव्हान स्वीकारले असून या बाल संस्कार केंद्रात विद्यार्थ्यांना भारतीय राज्य घटना,भगवत गीता, रामरक्षा,बोधपर कथा, देशभक्तीपर गीते, पसायदान, योगा,वैदिक गणित,भारतीय उत्सव संस्कृती,अन्न व पाणी बचत,जंगल संवर्धन, कार्यालयीन कामकाज, संगणक प्रशिक्षण,भाषा लॅब,यासह अनेक विषय शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परळीतील येणाऱ्या नवपिढ्यांसाठी हे केंद्र दीपस्तंभ ठरावे अशी अपेक्षा आदर्श शिक्षक सु.दे.लिंबेकर गुरुजी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अतुल नरवाडकर, ॲड.प्रताप धर्माधिकारी,अभय लोणीकर, श्रीपाद पाठक,अभिजीत तांदळे,चारुदत्त करमाळकर, जितेंद्र नव्हाडे,विनायक टूणकिकर,मोहनराव सावजी, हरिहर धर्माधिकारी,राहुल धर्माधिकारी,संदीप कनकदंडे यांच्यासह स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट व नरवाडकर कोचिंग क्लासेसच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.