• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राज्य कर्मचार्‍यांच्या संपाला परळीत प्रतिसाद शिक्षण, आरोग्य, महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम

राज्य कर्मचार्‍यांच्या संपाला परळीत प्रतिसाद
शिक्षण, आरोग्य, महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम

बीड | परळी वैजनाथ

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या संपाला परळी तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी (दि.17) संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयापुढे थाळीनाद आंदोलन केले.
गेल्या मंगळवार (दि.14) पासून राज्यभर कर्मचार्‍यांचे हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे शिक्षण, आरोग्य, महसूल व इतर सेवांवर परिणाम झाला आहे. परळी तालुक्यात या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मंगळवारी (दि.14) संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयापुढे धरणे दिले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. “एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणुन गेला होता. बुधवारी (दि.15) पंचायत समिती कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत कर्मचार्‍यांनी विविध घोषणा देत मोर्चा काढला. त्यात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बी.एल.रुपनर यांना देण्यात आले. गुरुवारी (दि.16) बीड येथे कर्मचार्‍यांच्या निघालेल्या मोर्चात परळी तालुक्यातून कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि.17) तहसील कार्यालयापुढे संपातील कर्मचार्‍यांनी थाळीनाद आंदोलन केले. कर्मचार्‍यांच्या संपामुळे परळी तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल, नगरपालिका, पंचायत समिती आदी विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, या संपात अद्याप जे कर्मचारी सहभागी झाले नाहीत अशा कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक समितीचे मार्गदर्शक बंडू आघाव, अशोक मस्कले, निलकंठ दराडे, प्रविण रोडे, मोहन गित्ते, विनोद मिसाळ, विष्णू गित्ते, राहुल पोटभरे, अशोक भोजने, डी.डी.गोरे, डी.जे.पवार, दिलीप भालेराव, प्रकाश मुंडे, अजय बळवंत, नंदकिशोर जातकर यांच्यासह शंकर गव्हाने, शशांक दामोशन, प्रविण काळे,एच.आर.घुले, गणेश फड, अनिल गवळी, सुरज शिंदे, सय्यद हासिब, विठ्ठल आम्ले, प्रताप कांदे, रामप्रभू फड, वैजेनाथ मुंडे, ज्ञानेश्वर कराड, कृष्णा धोत्रे, दिपक खंदारे,महिला प्रतिनिधी श्रीमती रमाताई दासूद, सुचिता गर्जे, एस.व्ही.बास्टे, सुनिता रांजनकर, मंगल मुंडे, एस.एस.शिंदे, व्ही.एस.गिरी, मंजुषा आरसुडे, अर्चना खाडे, आदींनी केले आहे.