• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सिद्धार्थ नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी गोविंद चौरे यांची सर्वानुमते निवड

सिद्धार्थ नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी गोविंद चौरे यांची सर्वानुमते निवड

परळी प्रतिनिधी…

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने परळीतील सिद्धार्थ नगर येथे त्रीशरण बौद्ध विहारात व्यापक बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक तथा जेष्ठ नेते आदरणीय माधवजी ताटे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय ऍड. दिलीप उजगरे मामा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आदर्श असावी असा निर्धार सर्वांनी केला
सिद्धार्थ नगर येथील आठरा पगड जातीच्या धार्मिक,सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे युवक चळवळीत अग्रेसर असणारे गोविंद श्रीराम चौरे यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी संदीप उर्फ गोटू सोनवणे यांची निवड करण्यात आली तसेच सचिव पदी संविधान उजगरे,कोषाध्यक्ष पदी राहुल पोटभरे,सल्लागार म्हणून संपत हजारे गुरुजी,सुधाकर साळवे,डि.जी मस्के अण्णा,दीपक पिंपळे,अशोक जाधव,पुंडलिक सरवदे,राजेभाऊ ताल्डे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस पत्रकार वैजनाथ गायकवाड,युवा नेते राज हजारे,गौतम साळवे,ज्ञानोबा मस्के,अनिल कांबळे,चन्द्रमणी तरकसे,प्रवीण सावंत,सुदीप सोनवणे,शिवराज वैद्य, राहुल वैद्य, विकास गायकवाड,जय तरकसे,विशाल सोनवणे,महादेव व्हावळे, सोनू ताटे, महेश सरवदे,मंगेश मस्के,भरत व्हावळे,सनी तरकसे,अनिल चव्हाण,सनि चव्हान,आशिष सरवदे,समाधान ताल्डे,अतुल मुंडे,संतोष व्हावळे,राजरत्न आवचारे,मिलिंद जाधव,धम्मा पैठणे,किशोर बहादूरे, अक्षय सावंत,सिद्धार्थ साळवे,समाधान कांबळे,रवी कांबळे,सुदर्शन कांबळे,आदेश गालफाडे,कपिल होके,आकाश कदम,पंडित सरवदे,लिंबाजी रोडे,बाली कसबे,सुनील व्हवले,रवी केदारे,राजाभाऊ गाडे,आनंद पुसे,सम्राट गायकवाड,रावसाहेब गोरे,अविनाश सुरवसे,व्यंकटेश घाडगे,यादव घाडगे,विकी कांबळे, अजय घोडके,समाधान घाडगे,भरत घाडगे,बादल घाडगे,ऋषी जोगदंड तसेच या बैठकीस सिद्धार्थ नगर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्तिथ होते.