• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केळगाव बेळगाव भ्रष्टाचार प्रकरणाची २० मार्चला होणार सुनावणी.

केळगाव बेळगाव भ्रष्टाचार प्रकरणाची २० मार्चला होणार सुनावणी.

हनुमंत गव्हाणे | केज प्रतिनिधी :

केज तालुक्यातील केळगाव बेळगाव येथे मंजूर झालेल्या १२५ विहिरी व १२ रस्ते यांची कामे न करताच निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेलगाव येथील समाजसेवक प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना निवेदन देऊन दिनांक २८ फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. दिनांक १५ मार्च बुधवार रोजी या उपोषणाचा १६ वा. दिवस असून भ्रष्टाचार प्रकरणी १७ सदस्सीय समिती नेमण्यात आली होती या समितीने अहवाल सादर केला असून या भ्रष्टाचार प्रकरणाची दिनांक २० मार्च सोमवारी सकाळी ११:०० वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणी मध्ये तक्रारदार प्रताप दातार, गटविकास अधिकारी पंचायत समिती केज, ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय केळगांव बेळगाव, तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय केळगाव बेलगाव,सरपंच ग्रामपंचायत कार्यालय केळगाव बेलगाव,रोजगार सेवक ग्रामपंचायत कार्यालय केळगाव बेळगाव व १७ सदस्सीय चौकशी समिती मधील सर्व सदस्य यांना २० मार्च सोमवार रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिनांक १५ मार्च बुधवार रोजी दिले आहेत.
जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे उपोषण करते प्रताप दातार यांनी म्हटले आहे .