• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पंकज कुमावत कार्याला सलाम कुमावत यांच्या बहाद्दर टीम ने पकडला तब्बल एकूण 51,36,600 रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल

◼️पंकज कुमावत कार्याला सलाम कुमावत यांच्या बहाद्दर टीम ने पकडला तब्बल एकूण 51,36,600 रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल

◼️पंकज कुमावत साहेबांसोबतच त्यांच्या बहाद्दर टीमचे सर्वत्र होत आहे कौतुक

सविस्तर वृत्त:

दिनांक 14/ 3 /2023 रोजी मध्यरात्री मा.सा.पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांची रात्री गस्त ( पेट्रोलिंग ) असल्याने त्यांचे सोबत स.फो.475 ढाकणे , पोलीस हेडकॉन्स्टेबल बांगर . दराडे पोना गिते चोपणे चालक पोहे वंजारे असे नाईट पेट्रोलिंग करत परळी शहर येथे आले असता मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमीमिळाली की एक आयशर

 

टेम्पो क्रमांक एच आर 69 डी 2302 मध्ये राजनिवास गुटख्याचा माल भरलेला असून सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणारे रोडवर एन के देशमुख यांचे इंडियन पेट्रोल पंपाचे बाजूला उभा लावून त्यातील माल काडीत आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाल दोन पंचांना सोबत घेऊन सदर ठिकाणी दिनांक 15 /03/ 2023 रोजी 00.15 वाजता जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणाहून गुटख्याचा माल घेऊन जणारा पिकअप टेम्पो व पोते उचलनरे लोक पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व आयशर टेम्पो व टेम्पो चालक जागीच मिळून आला त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साबेर सौंदाना सुन्नी राहणार: सुनेडा तालुका पुनाना राज्य हरियाणा असे सांगितले त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये प्रीमियम राज निवास सुग्धी पानमसाला गुटख्याचे 69 मोठे बोध व सुगंधी तंबाखूचे 14 मोठे बोधअसा एकूण 3321600 रू गुटक्याचा माल व आयशर टेम्पो किमती 1,80,0000 रुपये व एक मोबाईल किमती 15 000रुपये असा एकूण 51,36,600 रुपयांचा माल मिळून आल्याने त्यास सदरचा माल कोठून व कोणाकडून आणला व कोणास देणार आहे असे विचारले असता त्याने सांगितलं सदरचा माल इंदोर येथील व्यापाऱ्याकडून आणून परळी येथील व्यापाऱ्यास देणार असल्याचे सांगितले म्हणून त्याचे ताब्यात मिळून आलेल्या टेम्पो व गुटख्याचा माल ताब्यात घेऊन जप्त करून चालक व माल देणार व घेणार असे एकूण आठ आरोपी विरुद सफो मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम आंबजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब सहा फौजदार मुकुंद ढाकणे बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे,दिलीप गीते,विकास चोपणे यांनी केली आहे