• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️संभाजीनगर पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 14 मोटरसायकली जप्त

◼️संभाजीनगर पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 14 मोटरसायकली जप्त

◼️मोटारसायकली खरेदी करताना सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करूनच वाहने खरेदी करावी असे आवाहन संभाजीनगर पो. स्टे. पो. निरीक्षक सलीम चाऊस यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बीड 

सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. कमी किमतीमध्ये वाहन खरेदी करायचे व याबद्दल कोणीच विचारणार नाही या अविर्भावामध्ये वाहन वापरायचे, व ऐनवेळी पोलिसांनी जर गाडीची कागदपत्रे मागितली तर त्यावेळेस मात्र तारांबळ उडायची असाच प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे आणि ज्यावेळेला असं समजतं की आपण खरेदी केलेले वाहन हे चोरीचे आहे त्या वेळेला मात्र, आपल्या पायाखालची जमीन सरकते. असा प्रकार अनेकदा आपण पाहिलेला आहे अगदी तसाच प्रकार सध्या परळी मध्ये मोठ्याप्रमाणात फोफावत आहे.

सविस्तर वृत्त असे की, परळी येथे संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी नवीन वाहन चोरीच्या प्रकाराचा छडा लावला आहे,
पिंपरी चिंचवड क्राईम युनिट-(दोन) येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, पिंपरी चिंचवड पुणे पोलीस क्राईम युनिट- (दोन), निगडी यांच्या संयुक्त कारवाईत पुणे पिंपरी चिंचवड येथून मोटरसायकल चोरून परळी व परिसरामध्ये विकल्याचा तपास सुरू आहे, सदरील तपासातून आतापर्यंत परळी व परिसरामध्ये पिंपरी चिंचवड व पुणे परिसरामधून चोरलेल्याबऱ्याच मोटारसायकली पैकी 14 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. आणखीन अनेक मोटारसायकली ज्या चोरीकरून आणलेल्या आहेत त्यांची पडताळणीसाठी करून जप्तीची कारवाई सुरू आहे,
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) कविता नेहरकर मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नी. संभाजीनगर सलीम चाऊस, स.पो.नी महेंद्रसिंग ठाकूर, पो.नि.जितेंद्र कदम ( पुणे व टीम ), व्यंकट भताने, सचिन सानप, चंद्रय्या ऐटवार, रुपेश शिंदे, अर्जुन मस्के, दत्ता गित्ते, सिराज पठाण, यांनी केली आहे. सदरील प्रकरणाचा तपास आणखीन सुरू असून आणखीन बरीच वाहने हस्तगत होतील अशी माहिती संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सांगितले.

◼चौकट
(संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सलीम चाऊस यांचे जनतेस आवाहन )
सध्या बरीच लोंक आम्हाला कागद पत्राची काय गरज आम्ही शेतात वस्तीवर कींवा ईतर ठीकाणी वाहने वापरत असताना कोण कागदपत्रे मागणार असा समज निर्माण होऊन , कमी किंमतीत वाहन मिळत आहे या लालचेपोटी लोक वाहने विकत घेतात, आणी चोर जनतेच्या या गोष्टीचा फायदा घेवुन चोरीची वाहने विकतात नंतर मात्र गाडी घेणाऱ्याला कायदेशीर प्रक्रियेचा त्रास होतो तरी मोटार सायकल खरेदी करताना सर्व कागद पत्राची चौकशी करुनच मोटरसायकल खरेदी करावी़.
त्याच प्रमाणे सध्या ज्यांच्याकडे विना कागदपत्रांची वाहने असतील तर तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आवाहन संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.