• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील सह इतर दोघांवर कारवाई करा-संगीता तूपसागर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा )

नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील सह इतर दोघांवर कारवाई करा-संगीता तूपसागर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा )

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अंजली पाटील यांचा कसलाही संबंध नाही: संगीता तूपसागर

• पीडित डॉक्टर महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून सोबत असल्याचं प्रतिपादन संगीता ताई तूपसागर यांनी केले.

ND NEWS

लातुर राज्यरस्त्यावरील वाघाळा येथे अस्तित्वात असलेल्या नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका सौ. अंजली पाटील यांच्यासह राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरोधात अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1)(r), 3(1) (5), (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम ,1989 7 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती 3 (2) (va), अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, भारतीय दंड संहिता 1860 कलम 354-A, 504, 506,34 या कलमान्वये 9 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाधिक कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा संगीता ताई तूपसागर यांनी केली आहे .
सदरील आरोपी अंजली पाटील हिला एक वर्षापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून काढून टाकले आहे. आंबेजोगाई तालुका महिला कार्यकारणी बरखास्त केली होती. अंजली पाटीलचा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नाही. सदरील पीडित डॉक्टर महिलेस पीडित डॉक्टर महिलेस मनोरुग्ण ठरवून वेशा व्यवसाय करण्यास सांगितले, त्यांना एक्सपायर गोळ्या दिल्या जात, परंतु आम्ही पीडित डॉक्टर महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून सोबत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा संगीताताई तूपसागर यांनी केले.