• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केळगाव बेलगाव येथील भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावर सुरू असलेले आमरण उपोषण ११ व्या दिवशीही सुरूच.

केळगाव बेलगाव येथील भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावर सुरू असलेले आमरण उपोषण ११ व्या दिवशीही सुरूच.

ND NEWS | केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

केज तालुक्यातील केळगाव बेळगाव येथे मंजूर झालेल्या १२५ विहिरी व १२ रस्ते यांची कामे न करताच निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेलगाव येथील समाजसेवक प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना निवेदन देऊन दिनांक २८ फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत.
आज दिनांक १० मार्च शुक्रवार रोजी या उपोषणाचा ११ वा. दिवस असून उपोषण कर्त्याची प्रकृती चांगलीच खालावली आहे. उपोषण स्थळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार भीमराव धोंडे,माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यांनी उपोषण स्थळी भेटी दिल्या आहेत.
आज उपोषणाचा ११ दिवस आसूनही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी कारवाई केलेली नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर
निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे उपोषण करते प्रताप दातार यांनी म्हटले आहे.आज आणखी दि.१० मार्च शुक्रवार माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली असता ते काय म्हणाले पहा.