• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️रायगड प्रेस क्लबचा २६ मार्चला वर्धापन दिन सोहळा

◼️ND NEWS | 

रायगड प्रेस क्लबचा १७ वा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक २६ मार्च रोजी पोलादपूर येथे होत आहे.. एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्यास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खा. सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित राहणार आहेत..
मिड डेचे निवासी संपादक संजीव शिवडेकर यांना राज्यस्तरीय आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे..स्थानिक पत्रकाराचा देखील विविध पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.. कमलेश सुतार यांची लोकशाही चॅनलचे संपादक म्हणून नियुक्ती झाली असल्याने त्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे..तसेच मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह म्हणून निवड झाल्याबद्दल प्रवीण पुरो यांचाही सत्कार केला जाणार आहे..
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर आणि नियोजित अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले आहे..