• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या पथकाची पत्याच्या क्लब वर रेड पहाटे 2 च्या दरम्यान धाडसी कारवाई

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या पथकाची पत्याच्या क्लब वर रेड पहाटे 2 च्या दरम्यान धाडसी कारवाई

ND NEWS | बीड

काल दिनांक 09/02/2023 रोजी रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की बीड माळीवेस येथे इसम नामे सनी आठवले हा विना परवाना बेकायदेशीर रित्या आपली स्वतःचे फायद्या करिता आपले राहते घरासमोरील पत्राचे शेडमध्ये काही इसमाना एकत्र बसवुन् जन्ना मना नावाच्या जुगारावर पैसे लावून हार जितचा झन्नामन्ना नावाचा जुगार खेळ खेळतो आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्या वरुन सदरची माहिती मा पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब व त्यांच्या पथकातील पोलिस अधिकारी व अमलदार यांच्यासह सदर माहितीच्या ठिकाणी जाऊन दिनांक 09/03/2023 रोजी 1030 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणारे लोक पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले त्यावेळी रेड पार्टीतील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून क्लब मालक सनी शामराव आठवले यांचे सह एकूण 24 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी जुगरचे साहित्य मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 2,13,5970 मुदेमाला जप्त करून 24 आरोपी विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक वैभव अनिल सारंग पोलीस ठाणे केज यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरची कार्यवाही मा.पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब , पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग राजेश पाटील , पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर , राजू वंजारे , बालाजी दराडे , सचिन अहकारे पो हे का रुक्मिणी पाचपिडे ,आशा चौरे पोलीस नाईक विकास चोपणे ,अनिल मंदे , दिलीप गीते , महादेव भैरवाल, रामहरी भंडाने, संजय तुले , दीपक जावळे , शफिक पाशा , चालक सहाय्यक फौजदार शेषराव यादव युवराज भूबे यांनी केलेली आहे.