• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

संतोष खाडे यांची NT-D प्रवर्गातून राज्यात प्रथम तर राज्याचा गुणवत्ता यादीमध्ये 16 क्रमांक मिळवलेल्या संतोष खाडे यांचे. मौंजे डोंगरगण येथे ग्रामस्थांचा वतीने सरकार करण्यात आला.

ByND NEWS INIDIA

Mar 5, 2023

संतोष खाडे यांची NT-D प्रवर्गातून राज्यात प्रथम तर राज्याचा गुणवत्ता यादीमध्ये 16 क्रमांक मिळवलेल्या संतोष खाडे यांचे. मौंजे डोंगरगण येथे ग्रामस्थांचा वतीने सरकार करण्यात आला.

◼️ND NEWS | असिर सय्यद : आष्टी

मौजे डोंगरगण येथे संतोष खाडे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच ज्ञानेश्वर वाघ उपसरपंच परमेश्वर कर्डिले. ग्रा. सदस्य कुमार पवार युवा नेते ऋषीकेश गर्जे, शिवाजी गर्जे, संदीप जायभाये आणि इतर ग्रामस्थ वर्ग उपस्थीत होते.

संतोष खाडे यांची NT-D प्रवर्गातून राज्यात प्रथम तर राज्याचा गुणवत्ता यादीमध्ये 16 क्रमांक पटकावला आहे.
ND news ला बोलताना ज्ञानेश्वर गर्जे म्हणाले की संतोष खाडे यांची घरगुती प्रतिकूल परिस्थिती दिव्यांग वडील आणि आईच्या संघर्षाला मुलाच्या कर्तुत्वाचा सलाम आहे.
आईवडिलांच्या हातामध्ये 30 वर्ष होती उसाची बैलगाडी आता मुलाला मिळणार लाल दिव्याची गाडी. हे पाहून आईवडिलांचे आनंदाश्रू वाहू लागले…
संतोष यांचे शिक्षण खेड्यापाड्यात झाले पण गगन भरारी ही खूप मोठी.संतोष खाडे यांचा शेक्षणिक प्रवास पाहता वस्ती शाळे पासुन सुरु झाले इ. पाचवी आश्रम शाळा टाकळीकाझी,अहमदनगर. व सहावी, सातवी, भामेश्वर विद्यालय पाटोदा. व आठवी ते दहावी शिक्षण. श्री संत भगवान बाबा विद्यालय सावरगाव घाट असा माध्यमिक शिक्षण प्रवास झाला. व उच्च शिक्षण पुणे, मुंबई अहमदनगर अश्या ठिकाणी झाले. सध्या संतोष हे पुणे येथे त्यांचे मिञ श्री शिवाजी गर्जे यांच्या अनुअदिती अभ्यासिका नारायण पेठ, पुणे येथे अभ्यास करत त्यांनीं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले.
श्री संत भगवान बाबा यांच्या जन्म भूमि सावरगावघाट (भगवान भक्तिगड) मध्ये जन्माला आलेले संतोष अजिनाथ खाडे यांनी अत्यंत गरीबी मध्ये देखील आपले देह्य सोडले नाही. कारण हा हिरा. दयानिधी संत भगवान बाबाचां शिक्षणाचा संदेश साक्षात उतरवला . संत भगवान बाबा म्हणायचे ” जमिनी विका पन मुलांना शिका.” पण खऱ्या अर्थाने हे भगवान बाबांची विचारसरणी आचरणात आणून एक गोड उसाची आणि अपार परिश्रमाची पावती ही संतोष ला मिळालेली आहे.
हलाकीचा परस्थिती मधी देखिल हार न मानता आईवडीलांच्या हातातील 30 वर्षा पासुनचा ऊसतोडणी चा कोयता खऱ्या अर्थाने संतोषच्या मेहनतीने सुटणार आहे. तसे पाहिले तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा असे मानला जातो.
परंतू बीड जिल्हा ने असे बहुतांश हिरे हे ऊसतोडून अपार कष्टातून व मेहनतीतून मोठे यश संपादन करून राज्याला व देशाला मिळवून दिले आहे. या मधे देशाला हिरे मिळून देण्याचा नक्किच बीड जिल्हा चा खारीचा वाटा आहे असे म्हणल्यास वावघे ठरणार नाही.. अश्या या कष्टातून यशाची गरुड झेप घेउन आपले ध्येय साध्य करणाऱ्या संतोष खाडे यांना खूप खूप शुभेच्छा..