• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?

◼️धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?

◼️ND NEWS रत्नागिरी: खेड पांडुरंग कुबळ

अभूतपूर्व अशा दृश्याचं वर्णन काय करायचं. डोळ्या मावत नाही असं हे आई जगदंबेचं रुप आहे

लहानपणी बाळासाहेबांच्या भाषणाला जायचो. तेव्हा मला कळायचं नाही. पण आज मला जाणीव झाली

ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यांमध्ये बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. माझे हात आज रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. याच्यासाठी पूर्वजांची पुण्यायी असावी लागते. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमची साथ-सोबत मला पाहिजे.

जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?