• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शिक्षणाचा हक्क RTE 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-उत्तम ( दादा ) माने

शिक्षणाचा हक्क RTE 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-उत्तम ( दादा ) माने

ND NEWS | बीड : प्रतिनिधी

शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. या पंचवीस टक्के जागे मार्फत आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा पुरवली जाते, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTE अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या २५% जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बुधवार दि.01/03/2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.17/03/2023 ही आहे. तरी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन उत्तम यशवंत माने (भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य ) यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी सन 2023-2024 करीता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्याला शाळा मिळाल्यास पालकांचे वार्षिक उत्पन्न दाखला, पालकाचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, पालकाचे जात प्रमाणपत्र, पालकाचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. तसेच शासनाने शिक्षणापासून मुले वंचित राहू नये गरीब मुलांनादेखील अद्यावत व गुणवत्तापूर्वक इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे.
मोफत प्रवेशा साठीच्या फी साठीचा परतावा शासन करणार आहे. अशा महत्वपूर्ण व आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.तेव्हा पालकांनी आपला वेळ न दडविता ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात यावा असे आवाहन उत्तम यशवंत माने ( भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य ) यांनी केले आहे