• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लातूर येथील औद्योगिक वसाहतीतुन चोरीला गेलेली एक क्रूझर जीप केज पोलीसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाने ताब्यात घेतली आहे.

लातूर येथील औद्योगिक वसाहतीतुन चोरीला गेलेली एक क्रूझर जीप केज पोलीसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाने ताब्यात घेतली आहे.

ND NEWS | हनुमंत गव्हाणे : केज

या बाबतची माहिती अशी की,केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध शाखा (डी बी) पथकातील पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की,केज कळंब रोडवरील चिंचोली माळी पाटी जवळ एक सिल्व्हर रंगाची क्रूझर गाडी क्र. (एम एच २४/व्ही ७६२८) ही बेवारस स्थितीत उभी आहे. ही माहिती मिळताच दिलीप गित्ते यांनी ही माहिती त्यांचे वरिष्ठ केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना दिली. त्या नंतर डी बी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक राजेश पाटील,पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल महादेव बहिरवाळ, पोलीस नाईक शमीम शेख हे सदर संशयित क्रूझर जीप केज पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्या क्रूझर जीप बाबत पोलिसांच्या गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाने अधिक चौकशी केली असता; सदर क्रूझर जीप ही लातूर येथून चोरीला गेली होती. त्या बाबत एमआयडीसी पोलीस ठाणे लातूर येथे दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी गाडी मालक परमेश्वर हनुमंत पवार यांच्या तक्रारी वरून गु. र. नं. ११६/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक गोरख दिवे हे करीत आहेत.