• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केळगांव/बेलगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावरील अमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

केळगांव/बेलगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावरील अमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

 

ND NEWS |हनुमंत गव्हाणे

बेलगांव/केळगाव येथे २०१० ते २०२० दरम्यान मंजूर झालेल्या १२५ विहीरी व १२ रस्ते यांची कामे न करताच निधी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना निवेदन दिले असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर कार्यकर्त्या सहीत सकाळी अमरण उपोषणास बसले आहेत.

आज दि.१ मार्च २०२३ बुधवार रोजी उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषण स्थळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी भेट दिली. कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे यावेळी प्रताप दातार यांनी म्हटले आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची पुर्ण चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी या मागणसाठी प्रताप दातार ,अमोल भांगे, नितीन दातार ,संध्या भंडारे, रामेश्वर दातार ,अनिकेत पवार, रामेश्वर चौरे, नरसिंग दातार , आनंत जाधव, नवीन कुमार पांचाळ यांच्यासह माहिती अधिकार महासंघाचे कार्यकर्ते आझाद मैदानावर अमरण उपोषणास बसले आहेत.