• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डाॅ.संतोष मुंडेंचे सामाजिक कार्य बहुमोल- डॉ. भास्कर खैरे

महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डॉ. संतोष मुंडे यांच्यावतीने आयोजित मोफत डिजिटल श्रवण यंत्र कानाच्या मशीन वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:परळीत गरजूंना 100 मशीनचे वाटप

डाॅ.संतोष मुंडेंचे सामाजिक कार्य बहुमोल- डॉ. भास्कर खैरे

असेच काम सुरू ठेवले तर एक दिवस डॉ. संतोष मुंडे पद्मश्रीला पात्र होणार- राजेश्वर आबा चव्हाण

ND NEWS |  परळी वैजनाथ

डॉ. संतोष मुंडे यांचे सामाजिक कार्य हे सातत्याने सुरू असते. खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक जाणिवेतून वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. त्यांचे हे कार्य बहुमोल असल्याचे कौतुक स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .भास्कर खैरे यांनी केले. तर डॉ .संतोष मुंडे यांनी सामाजिक कार्यात एक मोठी उंची गाठलेली आहे. हे कार्य असेच सुरू राहिले तर एक दिवस ते नक्कीच पद्मश्रीला पात्र होतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी केले. परळीत शंभर गरजूंना मोफत डिजिटल श्रवण यंत्र कानाच्या मशीनचे वाटप करण्यात आले.
महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या वतीने आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डिजिटल श्रवण यंत्र कानाची मशीन वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, महावीर विकलांग संस्थेचे नारायण व्यास, डॉ. एकनाथराव मुंडे, जिल्हा रुग्णालय बीडचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ .रामा आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नाथराचे सरपंच अभय मुंडे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी डॉ .अरुण गुट्टे, परळी मेडिकल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर घुगे, सचिव डॉ. सतीश गुठे, संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन राजाभाऊ पौळ, अंबाजोगाई चे डॉक्टर राहुल मुंडे, रायुकाॅ शहराध्यक्ष सय्यद शिराज, ह भ प रामेश्वर कोकाटे , रवी आघाव , पद्माकर शिंदे ,ज्ञानेश्वर होळंबे, बालाजी दहिफळे, जयदत्त नरवटे, राम सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प गोविंद महाराज केंद्रे यांनी केले.
डॉ. संतोष मुंडे यांनी गरजूंना मोफत डिजिटल श्रवण यंत्राचे वाटप करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सातशे नागरिकांची नोंदणी झाली. त्यापैकी शंभर जणांना श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. उर्वरित नोंदणी झालेल्या गरजूंनाही येणाऱ्या काळात श्रवण यंत्र वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले. मोफत डिजिटल श्रवण यंत्र कानाच्या मशीनचे वाटप शिबिराला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रुग्ण उपस्थित होते.