• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध… ॲड.माधव जाधव

गॅस दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला लुटले…

केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध… ॲड.माधव जाधव

ND NEWS : परळी | प्रतिनिधी

देशामध्ये अगोदरच जनता महागाईने त्रस्त आहे.पेट्रोल,डिझेल,गॅस यांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा खूप वाढलेले आहेत. यामुळे केंद्रातील मोदी सरकार आल्यापासून जनता महागाईने त्रस्त आहे.त्यातच आज केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी व व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव ३५० रुपयांनी वाढवले आहेत. आज केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीमुळे आता यापुढे घरगुती गॅस सिलेंडर हे ११०३/- रुपयाला व्यावसायिक गॅस सिलेंडर हे २११९.५०/- रुपयाला येणार आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे खिसे कापण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे . या खिसे कापू सरकारचा जाहीर निषेध ॲड.माधव जाधव यांनी केला आहे.गॅस दरवाढ ताबडतोब केंद्र सरकारने माघारी घ्यावी अन्यथा केंद्र सरकारच्या विरुद्ध जनता रस्त्यावर उतरेल.त्याचप्रमाणे किसान काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरुद्ध लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे आवाहन मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव यांनी केले आहे.