• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कार्य उल्लेखनीय – मुख्य अभियंता मोहन आव्हाड

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कार्य उल्लेखनीय – मुख्य अभियंता मोहन आव्हाड
कर्मचाऱयांच्या हितासाठी न्याय लढाईसाठी कटीबद्ध – ॲड के.एस तूपसागर

ND NEWS | परळी प्रतिनिधी
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी आयोजित सत्कार समारंभात केले. ते मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित संचालक आणि सेवानिवृत्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के एस तूपसागर यांच्या सत्कार व्हीआईपी रेस्टहाऊस परळी येथे दि २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उपाध्यक्ष बी. एल. वाड्मरे हे होते. सत्कारमूर्ती सेवानिवृत्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के एस तूपसागर, थर्मल इंजिनीअर्स सोसाटीचे संचालकपदी हिमानी शिवाजी होटकर, कोषाद्यक्ष प्रदीप बुक्तार, राष्रीय वीज कर्मचारी सह पथसंस्थेचे संचालक अशोक व्हावळे, औष्णिक विद्युत केंद्र वसाहत गॅस वितरण संचालकपदी अनंत रोडे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड के एस तूपसागर पुढे म्हणाले कि सेवापूर्तीनंतर मी माझे एल एल एम या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी तसेच कर्मचाऱयांच्या हितासाठी न्याय लढाईसाठी कटीबद्ध राहील असे ते म्हणाले. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना नेहमीच साजगीकरणाच्या विरोधात देशव्यावी कार्यरत आहे. तसेच बहुजन समाजातील आरक्षणाच्या संविधानिक लढाईत नेहमी अग्रेसर असते. यावेळी मुख्य अभियंता आव्हाड यांना कामगार नेते मेघाजी लोखंडे यांचे पुस्तक भेट तर ॲड के एस तूपसागर यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. या कार्यक्रमास महेंद्र शिंदे, यशपाल मुंडे, शिवाजीराव होटकर, अरुण गित्ते, भगवान साकसमुद्रे,सोपान चौधर, बालाजी कांदे,महेश मुंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवर्धन सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत देवकर यांनी केले.