• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

संस्कृती रक्षणासाठी मातृभाषा रक्षण व संवर्धन आवश्यक – प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड

संस्कृती रक्षणासाठी मातृभाषा रक्षण व संवर्धन आवश्यक – प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड

भेल सेकंडरी स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

ND NEWS | बीड

येथील भेल सेकंडरी स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक व्याख्याते प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी ” आपल्या संस्कृतीचे रक्षण करावयाचे असेल तर मातृभाषा रक्षण व तिचे संवर्धन आवश्यक आहे. ” असे उद्‌गार त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
भेल सेकंडरी स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन ‘ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भीत्तिपत्रक तयार केली. कविता सादर केल्या व मनोगत व्यक्त केली. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना हसवत, खेळवत अंतर्मुख केले. आठवड्यातून एकदा तरी अवांतर पुस्तक वाचावे असा मोलाचा सल्लाही दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाने सहभाग घेतला. प्रास्ताविक श्री. उदय देशमुख सर यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद गौरशेटे लाभले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.स्वराली मिसाळ, श्रावणी चाटे, आनंदी मुंडे यांनी केले. मान्यवरांचा परिचय केशव राडकर सर यांनी केला. अध्यक्षीय समारोप प्रमोद सर यांनी व आभार नामदेव मुंडे सर यांनी मानले. अशोक बीडकर सर यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमच्या यशश्वीतेसाठी सहकार्य केले.