• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पाठलाग करून केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध पथकाने पकडला रिक्षा चोर

 

पाठलाग करून केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध पथकाने पकडला रिक्षा चोर

 

ND NEWS | हनुमंत गव्हाणे

केज  रिक्षा भाड्याने करून शहराबाहेर येताच रिक्षा चालकाला मारहाण करून रिक्षा पळवून घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा चोराला केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले.

या बाबतची माहिती अशी,की दि २७ फेब्रुवारी रोजी दुपारी लातूर येथील शिवाजी चौकातून अक्षय प्रभाकर कणसे याने विश्वनाथराव कराड वैद्यकिय महाविद्यालयात जाण्यासाठी म्हणून सचिन संजय वायकर याच्या रिक्षात क्र.(एम एच-२४/ ए टी-५२२७) मध्ये बसला.त्या नंतर तो तिथे न उतरता पुढे जाण्याच्या बहाण्याने रिक्षा गावाबाहेर घेऊन आला. रिक्षा गावाबाहेर येताच अक्षय कणसे याने सचिन वायकर याला मारहाण केली आणि त्याला चाकूचा धाक दाखवून रिक्षातून खाली ढकलून देत रिक्षा घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने पळून गेला. दरम्यान एका गुप्त बातमीदारा मार्फत या रिक्षाची माहिती केज पोलिसांना मिळताचा केज पोलीस सतर्क झाले.केज पोलिसांनी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक केज येथे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि वाहन चालक पोलीस नाईक हनुमंत गायकवाड यांनी सदर रिक्षा दृष्टीस पडतात त्याचा पाठलाग करून मुद्देमालासह ताब्यात घेतले. सोशल मीडियामुळे सापडला रिक्षा आणि चोर- अक्षय कणसे याने रिक्षा पळवून घेऊन जाताच रिक्षा चा फोटो सोशल मीडियावर टाकला होता त्यामुळे पोलिसांना माहिती देणाऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे रिक्षा आणि चोरांच्या केज पोलिसांनी मुसक्या आवळल्या.