• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केळगांव/बेलगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू.

केळगांव/बेलगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू.

*ND NEWS | हनुमंत गव्हाणे केज*

बेलगांव/केळगाव येथे २०१० ते २०२० दरम्यान मंजूर झालेल्या १२५ विहीरी व १२ रस्ते यांची कामे न करताच निधी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना निवेदन दिले असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते ते आज आझाद मैदानावर कार्यकर्त्या सहीत सकाळी अमरण उपोषणास बसले आहेत.
तक्रारीतील सर्व कामांची १२ रस्ते व १२५ विहिरी ची तपासणी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी गठीत केलेल्या १७ सदस्सीय समितीस दिले होते त्याची कालच चौकशी झाली पण गावकऱ्यांनी सांगीतल की फक्त वरवरची चौकशी केली जेथे खरी पहाणी करायची ती केलीच नाही..तरी याची योग्य ती चौकशी करावी व भ्रष्टाचार झाल्याचे उघड असताना याला कोण दडवून ठेवत आहे याची पूर्ण चौकशी करून तात्काळ न्याय मिळावा या साठी सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यांच्या प्रताप दातार ,अमोल भांगे, नितीन दातार ,संध्या भंडारे, रामेश्वर दातार ,अनिकेत पवार, रामेश्वर चौरे, नरसिंग दातार , आनंत जाधव, नवीन कुमार पांचाळ प्रवीण प्रधान, गुरुदेव गवंडी हे सर्व आझाद मैदानावर अमरण उपोषणास बसले आहेत.