• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज डीबी पथक यांनी मोटरसायकल चोरास केली अटक

केज डीबी पथक यांनी मोटरसायकल चोरास केली अटक

हनुमंत गव्हाणे | केज तालुका ND NEWS

दिनांक 26.2.2023 रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे केज शहरातून मागील वर्षी मंगळवार पेठ कॉर्नर केज येथून चोरी गेलेली मोटार सायकल चोरीतील आरोपी बस स्थानक परिसर अंबाजोगाई येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुण लागलीच डीपी पथकातील कर्मचारी यांनी *खाजगी वाहनाने* अंबाजोगाई येथे जाऊन तेथील स्थानिक पोलीस कर्मचारी घोळवे चादर यांचे मदतीने आरोपी नामे राहुल शरद शिंदे वय 21 रा. क्रांतीचौक धारूर यास मो.सा.क्र. 44 R 3009 हिचेसह ताब्यात घेऊन पोस्टेस आणून आवश्यक त्या बाबी पूर्ण करून गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक मुंजाळ हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही स.पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेहरकर मॅडम तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, स.पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गीते, महादेव बहिरवाल यांनी केलेली आहे.