• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर नटले

छत्रपती संभाजीनगर :

ND NEWS  | छत्रपती संभाजीनगर  येथे यंदा “जी-२०” परिषद होणार आहे. मागील काही दिवसांपासून या परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. “जी २०’ परिषदेसाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी आलेल्या १३ पाहुण्यांचे महाराष्ट्रीयन परंपरेने स्वागत करण्यात आले. पाहुण्यांना गळ्यात झेेंडूच्या फुलांचा मोठा हार घालण्यात आला, तसेच प्रत्येकाचे महाराष्ट्राच्या पारंपारिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. दरम्यान, आज बहुतांश प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल होणार आहेत.

 

चिकलठाणा विमानतळावर ‘जी २०’ परिषदेसाठी शनिवारी (२५ फेब्रुवारी) तीन देशांतून परदेशी पाहुणे विमानतळावर आले. शहरात आयोजित ‘वुमन २०’ बैठकीसाठी नायजेरिया, अमेरिका आणि तुर्की येथून महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाल्या. हैदराबादहून दुपारी ४.२० वाजता इंडिगोच्या विमानातून इमलॉन टिर्की, पल्लवी पाठक यांचे आगमन चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. नवी दिल्ली येथून सायंकाळी ५.१० वाजेच्या इंडिगो विमानाने चार महिला सदस्यांचे विदेशातून आगमन झाले. यात केलेसे हॅरिस, चेरी डी, मिलर, डॉ. संध्या पुरेचा, डॉ. शमिका रवी यांचा समावेश होता.  मुंबईहून शहरात सायंकाळी ५.४० वाजता आलेल्या इंडिगो विमानातून पाच महिला सदस्यांचे आगमन झाले.  नर्निया बोहलर, शिबूले पॉश्चोव्ह, सेविन काया आणि फातेमा क्विसिक यांचे आगमन झाले. विविध देशांतून आलेल्या प्रत्येक महिला पाहुण्यांना पैठणी शाल घालण्यात आली.  या १३ जणांमध्ये अमेरिका, इंग्लड, तुर्की या देशांतले हे प्रतिनिधी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.